अकोला - मलकापूर परिसर महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे; पण या गावाला शुद्ध पाणीपुरवठा न करता कुंभारी येथील तलावातून कोणतीही प्रक्रिया न करता अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याविरोधात मलकापूर, शिवणी येथील नागरिकांच्यावतीने २९ मे रोजी महापालिकेवर नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात घागर मोर्चा काढण्यात आला.