सुकामा येथे शहीद झालेल्या जवानांना वाशिममध्ये श्रद्धांजली

2021-09-13 0

वाशिम : नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना स्थानिक पाटणी चौकात २५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 
यावेळी मारवाडी युवा मंचच्यावतिने आयोजित कार्यक्रमात मेणबत्त्या व दिवे लावून दोन मिनीटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. यावेळी महार रेजिमेंटचे एक्समॅन नायब सुबेदार तथा बोरगावमंजु येथील रहिवासी सी.एम. सुरडकर यांची उपस्थिती लाभली होती.

Videos similaires