नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक अडचणीत आली असून, या बँकेत नाशिक मधील शेकडो शिक्षकांचे पगार अडकले आहेत. या शिक्षकांचे वेतन तातडीने मिळावे यासाठी शेकडो शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. बँक संचालकांसमवेत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यावेळी दिले