कोल्हापूर : देशातील दुसर्या क्रमांकाचा व राज्यातील पहिला क्रमांकाचा सर्वाधिक उंची असणार्या ध्वजस्तंभ कोल्हापुरात उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. तब्बल 303 फूट उंचीचा असणारा हा ध्वजस्तंभ जोडणीचे काम गेले चार दिवस पोलीस उद्यानात सुरू होते. या ध्वजस्तंभाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते व अमीर खान याच्या उपस्थितीत १ मे महाराष्ट्र दिनी होणार आहे.