मुंबई : मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलन करत असलेल्या शिक्षकाने झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांसह सर्वांचीच तारांबळ उडाली. मातंग समाजाला अ, ब, क, ड, नुसार वेगळे आरक्षण देण्याची मागणी आंदोलक करत होता. अखेर 15 मिनिटे समजावल्यावर हा आंदोलक झाडावरून खाली उतरला.