सांगली - तमिळनाडूतील जलिकट्टू आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवावी या मागणीसाठी चाकण आणि कराड येथे आंदोलने करण्यात आली होती. आज सांगली येथे बैलगाडी शर्यती सुरू करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पवनचक्कीच्या टॉवरवर चढून एका शेतकऱ्याचे आंदोलन केले आहे.