Ambad (Jalna) : मनसेच्या वतीने जलसमाधी आंदोलन
Ambad (Jalna) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील बारसवाडा येथील गल्हाटी प्रकल्पात सोमवारी(ता.13)सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष बळीराम खटके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना खरीप पिकांची व फळबागांची वादळ,वारे, अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी.यासाठी शासण व प्रशासन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे.मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांचे मार्फत गत चार दिवसांपूर्वी गुरूवार(ता.9)मागण्याचे लेखी निवेदन देऊन चार दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर सोमवारी(ता.13)हे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या (MNS) वतीने दिला होता.
(Video : बाबासाहेब गोंटे)
#ambad #MNS #jalna