वसई - सोनू झा या तरुणाच्या मारेकऱ्यांवर कारवाई करावी यासाठी संतप्त जमावाने विरार पोलीस ठाण्यावर मृतदेहासह मोर्चा नेला होता. त्यावेळी अचानक बिथरलेल्या मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. जमावाने पोलीस ठाण्यात तोडफोड करीत पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच वसई विरार पालिका परिवहन ची एक बस आणि दोन रिक्षांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.