वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील शेतक-यांनी लावणा फाट्याजवळ वीज वितरण कंपनीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनामध्ये शेकडो शेतक-यांनी सहभाग नोंदवत आपला रोष व्यक्त केला. माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.