पुण्यातील गणेश भक्ताकडून ऑलिम्पिक खेळाडूंना अनोखी मानवंदना

2021-09-12 839

टोक्यो ऑलिम्पिक भारतीयांसाठी खास ठरलं. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिंकत देशाची मान उंचावली. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंचा देखावा एका गणेशभक्ताने साकारला आहे. पुण्यातील शनिवार पेठेत राहणाऱ्या संजय तांबोळी यांनी हा देखावा साकारला आहे. या देखाव्यातून त्यांनी ओलीम्पिकमध्ये पदकं मिळवून देणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या खेळांचे देखावे उभारले आहेत. फ्लाईंग किंग मिल्खा सिंग यांना देखील या देखाव्यातून मानवंदना देण्यात आली आहे.