देशाच्या राजकारणात एक मोठी घटना काल घडली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी अचानकपणे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दोघेही गुजरातचे.. त्यामुळे या राजीनाम्याची जोरदार चर्चा झाली. आता गुजरातचे पुढचे मुख्यमंत्री कोण ? अशी चर्चा सुरु झालीय. या चर्चेत आता चंद्रकांत पाटील हे नाव देखील आहे.. चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे नाही. तर गुजरातचे चंद्रकांत पाटील.. सी.आर.पाटील म्हणून त्यांना ओळखलं जातं. गुजरातच्या नवसारी लोकसभा मतदारसंघातून ते तब्बल पावणे दहा लाख मतं घेत निवडून आले होते.. विक्रमी मतांनी निवडून येणारे खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. २०१४ च्या निवडणुकीत देशात सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येणारे तिसऱ्या क्रमांकाचे ते खासदार होते.
Ashwin vo
#Gujaratcm #PrafulPatel #chandrakantpatil #VijayRupani #Lokmat