राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवरून चाकणकरांचा संतप्त सवाल

2021-09-11 62

मुंबईतील साकीनाका येथे महिलेवर अमानवी बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी "निर्भया घडल्यानंतरच चर्चा करणार आहोत का ?", असा संतप्त सवाल विचारला आहे. कायद्यांसोबतच संस्कारही महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

Videos similaires