Snake-Mongoose Fight Viral Video : साप-मुंगसाची ही लढाई पाहिलीत का ? Maharashtra | Sakal Media |

2021-09-09 40

मुंगूस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वांनाच माहिती आहे. हे दोघेही एकमेकांचे दुश्मन समजले जातात. साप आणि मुंगूस हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात लढाई सुरू होणारच यात शंका नाही. अशाच एका झुंजीचा थरार अकोल्यातील ग्रामीण भागातील एका रस्त्यावर पाहायला मिळालाय. अकोल्यातील पारडी गावातील हा व्हिडिओ असल्याचे समजते.
रस्त्याच्या मधोमध कोब्रा जातीच्या सापाची आणि मुंगूस यांच्यात झुंज सुरु झाली. या लढाईतील मुंगुस तसं लहान दिसत होतं आणि नाग मात्र चांगलाच ताकदवान वाटत होता. अशी विषम वाटणाऱ्या लढाईतही मुंगसाने नागाला जेरीस आणलं. साप आणि मुंगसाच्या लढाईचा हा प्रकार काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात काढला. आणि त्यांच्या लढाईचा हा विडिओ व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या लढाईत शेवटी कोण जिंकलं हे तुम्हीच पहा
#viralvideo #snake #mongoose #fight #akola #maharashtra #news #marathi #marathinews #latest #enimies #videoviral #sakal #sakalnews