Rain Updates Amravati : अमरावतीत पावसाचा कहर, बचावकार्य सुरू
Amravati : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. तसेच तिवसा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. तिवसा तहसीलदार वैभव फरतारे व बचाव पथकाच्या मदतीने आज सकाळापासूनच अनेक ठिकाणी पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
#amravati