अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट(Akkalkot) तालुक्यातील बोरगाव(Borgaon) व घोळसगाव(Gholasgaon) तसेच परिसरात या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बोरगाव ते घोळसगाव ओढ्यावरील पुलावर सतत पाणी येऊन वाहतूक बंद पडत आहे. यामुळे परिसरातील बोरगाव, वागदरी व घोळसगाव या गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक शेतकरी प्रवासी पलीकडे अडकले आहेत. बोरगाव ग्रामस्थांची 60 टक्के शेती ही ओढ्याच्या पलीकडे असून, त्यांना त्यांच्या शेतीकडे जनावरांना चारापाणी करण्यासाठी जाणे अडचणीचे ठरत आहे. काही जण धोकादायकरीत्या नाइलाजाने पाण्याने वाहणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून जीव धोक्यात घालून जात आहेत. (बातमीदार व व्हिडिओ : राजशेखर चौधरी)
#akkalkot #akkalkotsolapur #borgaon #gholasgaon #solapur #akkalkotnews #solapurnews