स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या पदयात्रेला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी यासाठी कोल्हापूरमधून सुरु झालेली ही यात्रा आज नृसिंहवाडीत दाखल झाली. यावेळी स्वाभिनामानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या मारल्या. पोलीस प्रशासनाच्या बोटींच्या सहाय्याने त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.