आज जागतिक शिक्षकदिवस आहे. शिक्षकदिनाचे औचित्य साधत विविध मागण्यांसाठी शिक्षकांकडून आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यात शिक्षक आयुक्त कार्यालयाबाहेर राज्य सरकार आणि शिक्षण मंत्र्यांविरोधात घोषणा दिल्या गेल्या. महाराष्ट्र प्राध्यापक संघटना आणि महाराष्ट्र राज्य अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन वाढीव पद शिक्षक कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.