Ganesh Festival : पेणमध्ये १४ वर्षांपासून महिला साकारतायत बाप्पांच्या सुंदर मूर्ती
पेण म्हटलं की सर्वांना आठवतात गणपतीचे कारखाना. पेणमधील कासार आळीमध्ये अनेक मूर्तिकारांचे कारखाने आहेत. ज्यामधून अनेक सुंदर व सुबक बाप्पांच्या मूर्ती साकारल्या जातात. पण याच कासार आळीजवळ असा एक कारखाना आहे जिथे गेल्या १४ वर्षांपासून फक्त महिला बाप्पांच्या मूर्ती साकारत आहेत.
#GaneshFestival2021 #Ganeshotsav2021 #SakalMedia