Kadgaon (Kolhapur) : भुदरगडातील मेघोली लघु पाटबंधारे प्रकल्प फुटला; एका महिलेचा मृत्यू
Kadgaon (Kolhapur) : भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु तलाव फुटला. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता, की ओढ्याच्या दोन्ही बाजूंची सर्व पिके वाहून गेली. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ आदी गावांचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, नवले येथील धनाजी मोहिते यांच्या पत्नी जिजाबाई मोहिते (वय ५५) वाहून गेल्याचे सांगण्यात आले.
#kadgaon #kolhapur