Chalisgaon Flood : पुरातून सावरण्याची नागरिकांची धडपड सुरु, अनेकांचे संसार उघड्यावर

2021-09-02 123

Chalisgaon Flood : पुरातून सावरण्याची नागरिकांची धडपड सुरु, अनेकांचे संसार उघड्यावर

Chalisgaon Flood : तितूर आणि डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे. सध्या पूर ओसरला असल्याने पुरातून सावरण्याची धडपड सुरू आहे. पुरामुळे वाहून आलेली घाण आणि गाळ काढण्याचं काम पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे. या पुरामुळे नदीकाठालगत राहणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. पुरामुळं अनेक घरं पडल्यानं राहायचं कुठे असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
दुसरीकडे नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागाने पथके तयार केली असून पंचनामे करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.

#Chalisgaon #jalgaon

Videos similaires