धक्कादायक : अंदोरीतील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह नीरा उजव्या कालव्यात सापडले

2021-08-29 2,448

लोणंद : अंदोरी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा अशिष व अडीच वर्षाची मुलगी ऐश्वर्या कालपासून बेपत्ता झालेल्या या लहानग्या सख्या बहीण भावांचे मृतदेह आज (ता. २९) सकाळी नीरा उजव्या कालव्यात पाडेगाव व पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत आढळून आले. लोणंद पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करून लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. लोणंद पोलीस कालपासून या मुलांचा शोध घेत होते. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर ट्रेकर्सच्या कार्यकर्त्यांनी रात्री दोन वाजेपर्यंत शोध घेवूनही काहीच हाती लागले नव्हते. मात्र आज ( ता. २९) रोजी सकाळी शोध घेत लोणंद पोलिसांना पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या लहानग्याचा तर दुपारी ऐश्वर्या या आडीच वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह पिंपरे बुद्रूक गावच्या हद्दीत चव्हाण वस्ती आढळून आला.
व्हिडीओ : रमेश धायगुडे
#brotherandsisterdrowned #lonand #lonandnews #brothersisterdrowned #niracanal #sataradistrict

Videos similaires