राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिल्याने शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडले आणि राष्ट्रनायक झाले, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह(Rajanth Singh) यांनी केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. विविध राज्यात प्रवास करताना नेते मंडळी तिथल्या स्थानिक मुद्द्यांची पूर्वमाहिती घेऊनच त्याबाबत वक्तव्य करतात. मात्र महाराष्ट्रात येताना राजनाथ सिंह यांना छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडविले, त्याबद्दलचे वाद-प्रवाद याबद्दलची माहिती कोणी दिली नाही का, अशी चर्चा सूरू झाली आहे. खेळांचं महत्त्व पटवून देताना त्यांनी महाराजांबद्दल हे विधान केलं. या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
#RajnathSingh #Statment #Pune #SakalMedia