नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु, रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा

2021-08-27 1,422

रत्नागिरी(Ratnagiri) : नारायण राणेंच्या(Narayan Rane) स्वागताचे बॅनर्स विविध ठिकाणी झळकले असून, भाजप(BJP) कार्यालयात त्यांचा जंगी सत्कार होणार आहे. राणे हेलिकॉप्टरने जुहू विमानतळ येथून निघून रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले आहेत. या ठिकाणी त्यांचे ढोल ताशाच्या गजरात नारायण राणे यांचं जंगी स्वागत रत्नागिरीत भाजपकडून करण्यात येतंय. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे नेते आशिष शेलार,प्रसाद लाड ‌आहेत. राणे यांच्या तिसऱ्या जनआशीर्वाद यात्रेला(Jan Aashirwad Yatra) सुरुवात झाली आहे.
#NarayaRane #Ratnagiri #JanAshirwadYatra #BJP #SakalMedia