CCTV । पुण्यात म्हशीने दुचाकीस्वाराला दिली धडक

2021-08-26 130

पुण्यातील कॅम्प परिसरात म्हशीने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना आहे. महमंद स्ट्रीट रस्त्यावरून पाच-सहा म्हशी जात होत्या. त्यावेळी त्यांच्यापैकी एका म्हशीने रस्त्यावरून जाणार्‍या दुचाकी चालकाला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली महिला जखमी झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.