शिवसेना नेते खासदार विनायक राउत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळगाव मालवण येथील बंगल्यावर, अज्ञातांनी सोड्याच्या बाटल्या तसेच दगडफेक केली... ही घटना काल रात्री उशिरा करण्यात आली, असून बाईकवरुन चार ते पाच हल्लेखोर आले होते... हल्ला केल्यानंतर सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याची माहिती आहे... पोलीसांकडून या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय... केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटत असल्याचं पाहायला मिळतंय... विनायक राऊत सध्या दिल्ली येथे असून त्यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत जोरदार टिका करत पंतप्रधानांना पत्र लिहून, राणेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली होती.
#vinayakraut #narayanrane #uddhavthackeray #narendramodi #bjp