Athawale On Rane's Statement : राणेंची भावना मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची नाही…
Nagpur : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महाराष्ट्राचे नेते आहेत. राज्याचा विकास व्हावा, ही त्यांचीही मनोमन इच्छा आहे. पण राज्य सरकार विकासाकडे लक्ष देत नाहीये. पूरस्थिती असो की कोरोना, दोहोंकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ॲक्टीव्ह राहावे, अशीच मंशा नारायण राणे यांची आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची भावना राणेंची नाही, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) आज येथे म्हणाले.
#RamdasAthawale ##NarayanRane #nagpur