Nashik; राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक! भाजप कार्यालयाची तोडफोड

2021-08-24 4,367

नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणेनी (narayan rane) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्याविरोधात केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता असून त्यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीसांनी दिले आहेत. राणेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं एक पथक रवाना झालं आहे. अशी माहिती शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी दिली. राणेंच्या विरोधात नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून आता राणे विरुद्ध शिवसेना वाद चांगलाच तापल्याचं दिसत आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक नाशिकमध्ये आक्रमक नाशिकमधील भाजपच्या कार्यालयावर दगडफेक झाली आहे. याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याबाबत नाशिकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी माहिती दिली आहे.
#narayanrane #shivsena #uddhavthackeray
#bjp

Videos similaires