Shirdi; देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील(Shirdi) साईबाबा(Saibaba) संस्थानच्या, विश्वस्त मंडळामधील काही सदस्यांची बदली होण्याची शक्यताय.. नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या काही विश्वस्त मंडळामधील काही नावांवर, विधी खात्याने आक्षेप घेतलाय... शिर्डी येथील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपलीय.. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारला, कोर्टाच्या आदेशानंतर नव्या मंडळाची नियुक्तीबाबत सांगण्यात आलं होतं... मधल्या काळात सरकारने राजकीय मेळ घालणारी यादी तयार केली. मात्र, ती अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच बाहेर आली... यामध्ये विश्वस्त मंडळाचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे(NCP) तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे(Shivsena) असल्याची माहितीय.. काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा तर शिवसेनेचे पाच सदस्य सरकारनं नियुक्त केलेत.. पण यातील नावांवरच आक्षेप असल्याने विश्वस्तांची ही यादी अद्यापही जाहीर झालेली नाही.
#saibaba #saibabamandir #shirdi #NCP #shivsena