देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्षे झाली तरीही तृतीयपंथी समाजाला अजूनही मनाचं स्थान मिळत नाही. कायम हा समाज लोकांच्या हेटाळणीचा विषय असतो. एका बाजूला आपण स्त्रीपुरुष समानतेच्या गोष्टी करत असलो तरी तो आणि ती यांच्यामध्ये असणाऱ्या त्यांना आपण सोईस्कर रित्या विसरतो. पण यंदाच्या वर्षी तृतीयपंथी समाजातील लोकांच्या हस्ते झेंडावंदन करून अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी एक नवा पायंडा पडलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.