पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीला भेट देऊन शिवसृष्टीमध्ये उभारण्यात येत असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी केली. तसेच, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चाही केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्रा. अनिरुद्ध देशपांडे, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान’चे विश्वस्त जगदीश कदम, आचार्य गोविंदगिरी महाराज आदी या वेळी उपस्थित होते.
#bhagatsinghkoshyari #babasahebpurandare #punenews #puneliveupdates #punenewsupdates #punelive