Aurangabad Accident : चारचाकी गेली २५ फुट खोल पाण्यात

2021-08-12 1,335

Aurangabad Accident : चारचाकी गेली २५ फुट खोल पाण्यात

Beed Bypass रस्त्यावरील MIT महाविद्यालयाजवळील घटना, कारची काच फोडून चालकाला काढले वर

Aurangabad : महानुभव आश्रमाकडून Beed Bypass मार्गे Sangramnagar flyover कडे जाणारी चारचाकी कार MIT महाविद्यालयाजवळील flyover साठी खोदलेल्या २५ फुट खड्ड्यातील पाण्यात पडली. ही घटना गुरुवारी (ता.१२) रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे पाण्यात कार पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र कारमध्ये नेमके कितीजण आहेत याबद्दल कोणालाच कल्पना आली नव्हती. दरम्यान एका नागरिकाने पाण्यात उतरत काच फोडून आतील चालकाला बाहेर काढले. भगवान तेजराव कोंडके (वय अंदाजे ५५, रा. गादिया विहार) असे त्या चालकाचे नाव असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.

#accident #aurangabad

Videos similaires