Schools May Not Reopen From 17th August : शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे..

2021-08-12 1,554

Schools May Not Reopen From 17th August : शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे..

Mumbai : १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.. कारण शाळांच्या
मुद्द्यावरून ठाकरे सरकारमध्ये प्रचंड गोंधळ दिसून येतोय.. शाळा सुरू करण्याला टास्क फोर्सचा विरोध आहे, मुख्यमंत्री बैठक घेऊन याबाबत अंतिम निर्णय घेतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं होतं...मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी, १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती.. हा गोंधळ कमी म्हणून की काय, तर मी या निर्णयाशी सहमत नाही असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले... पालक आणि विद्यार्थ्यांच्या भावनांशी हा काय खेल चालवलाय, असा संतप्त सवाल महाराष्ट्र विचारतोय...

#schoolreopen #mumbai #maharashtra

Videos similaires