Shivansh Adagale; सव्वादोन वर्षाच्या 'शिवांश'ची इंडिया 'बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये नोंद

2021-08-11 964

शिवाजीनगर(Shivajinagar) : विश्रांतवाडी(Vishrantwadi) येथे राहत असलेले चंद्रशेखर अडागळे(Chandrashekhar Adagale) व त्यांची पत्नी मृणाली(Mrunali Adagale) यांचा मुलगा शिवांश(Shivansh) हा अवघा सव्वादोन वर्षाचा असताना त्याची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड(India Book Of Record)'ने घेतली आहे. शाळेत जाण्यापूर्वीच शिवांशला २३ मराठी व इंग्रजी कविता तोंडपाठ आहेत, एक ते तीस पर्यंतचे इंग्रजी आकडे, संपूर्ण इंग्रजी वर्णमाला शब्दा सहित म्हणून दाखवतो, 12 रंग, 37 प्राणी, 14 फळे, 12 भाज्या, 20 अवयव, 10 आकार ओळखतो व बोलून दाखवतो. 1 ते 10 इंग्रजी अंक संगणकाच्या की-बोर्ड वर बिनचूक टाईप करतो. पंधरा प्राण्यांचे आवाज काढतो. हनोई टॉवर नऊ सेकंदात लावतो. २७ पेक्षा जास्त क्रिया करतो, आठवड्याचे दिवस म्हणून दाखवतो, वाहनांचे वेगवेगळे भाग ओळखतो. हे कौशल्य पाहून शिवांशची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol), आमदार सुनील टिंगरे(Sunil Tingare), जगदीश मुळीक(Jagdish Mulik), प्रदीप देशमुख(Pradeep Deshmukh), विनोद पवार(Vinod Pawar) यांनी शिवांशचा सत्कार करून कौतुक केले.
#shivansh #indiabookofrecord #shivanshfromvishrantwadi #Punenews #puneupdates #punelivenews

Free Traffic Exchange

Videos similaires