समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सकाळने घेतलेल्या भूमिकांना लोकबळ लाभत आहे. यातून जनमानसात सकाळचे स्थान येथे बळकट आहे.’’ असे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छ्त्रपती यांनी आज येथे केले.
दै. सकाळचा ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजवणाऱ्या तसेच नव्या युगात काळाशी ससुंसगत अशी भरारी घेत कतृत्व सिध्द करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
अनेक पर्यावरण, जलसंवर्धन, प्रदुषण मुक्त रक्षा विर्सजन, डॉल्बी मुक्ती, नदी तलाव जंगल स्वच्छता असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सकाळने राबवले त्यातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झाले ते लोकांनी स्विकारले संवर्धीत केले, लोकसमुहच सकाळच्या उपक्रमांना बळ देत आहे - संपादक संचालक श्रीराम पवार
सर्वसामान्यांचा आवाज म्हणून सकाळ भूमिका मांडत आहे. जलसंर्वधन सारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवर व्यापक उपक्रम राबवून सकाळने सामाजिक भाणही जपले आहे, ही बाब उभारी देणारी आहे असे प्रतिपादन आमदार डॉ. चंद्रकांत जाधव यांनी केले.
यावेळी उद्योजक बाळासाहेब कवडे, अभिनेता धनंजय पोवार, स्टार्टप संचालक सचिन कुंभोजे, रेसर - सुहासीनी पाटील, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे व सहकारी यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळचे उप सरव्यवस्थापक रविंद्र रायकर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी निवासी संपादक निखिल पंडीतराव यांनी आभार मानले.
#Kolhapur #Sakal41thAnniversary #ChatrapatiShahuMaharaj #SakalMedia