Mirgaon Landslide (Satara) : पोलिस Patil Sunil Shelar गावकऱ्यांसाठी ठरले 'देवदूत'; तब्बल 60 जणांचा वाचवला जीव

2021-07-26 959

Mirgaon Landslide (Satara) : पोलिस Patil Sunil Shelar गावकऱ्यांसाठी ठरले 'देवदूत'; तब्बल 60 जणांचा वाचवला जीव

Mirgaon (Satara) : भूस्खलनात पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील Mirgaon येथील अनेक जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. दुर्घटनेपूर्वी तेथील ग्रामस्थांना वाचवण्यासाठी Mirgaon येथील पोलिस Patil Sunil Shelar यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. रात्री साडेदहा वाजता सर्व नागरिकांना त्यांनी घराबाहेर पडण्यासाठी घरोघरी जाऊन आवाहन केले. त्यामुळे गावातील पन्नास ते साठ लोकांचे जीव वाचले आहेत. त्यामुळे Mirgaon चे पोलिस Patil हे गावकऱ्यांसाठी देवदूतच ठरले आहेत. मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयनानगर परिसरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयनानगर परिसरातील डोंगराकडेच्या तीन गावांत भूस्खलन झाले. त्यामध्ये Mirgaon, ढोकावळे या गावांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

Video : हेमंत पवार

#mirgaon #satara

Videos similaires