राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले होते. खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणाऱ्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय जाणून घेऊ या व्हिडिओ मधून.
#water #dam #mansoon #TMC #QSEC