ATM फोडून १५ लाख पळवणाऱ्या चौघांना अटक

2021-07-24 218

पिंपरी-चिंचवडमध्ये ATM फोडून १५ लाखांची रक्कम घेऊन पोबारा करणाऱ्या गुन्हेगारांना गजाआड करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. कौतुकास्पद म्हणजे पोलिसांनी आरोपीच्या चप्पलेवरून गुन्हा उघड करून गुन्हेगारांपर्यंत पोहचत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या कामगिरीने अक्षरशा सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणजे काय असतं, याचाच प्रत्यय आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

#CCTVCamera #pune #ATM #Crime