इचलकरंजी पाणी पातळी 76 फुटांवर; गावभाग परिसर पाण्याखाली

2021-07-24 4

पंचगंगा नदीने रौद्र रूप धारण केले असून शहरातील गावभाग परिसराला पाण्याने वेढले आहे. गेल्या पाच तासात तब्बल 8 फुटाने पंचगंगा नदी पातळीत वाढ झाली आहे. धोका पातळी गाठून 2019च्या महापुराच्या पाण्याच्या पातळी नजीक पुराच्या पाण्याचा शिरकाव वाढत आहे. गावभाग परिसरातील सर्व कुटुंबातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. पाण्याचा शिरकाव वाढत असल्याने प्रशासनाने आसपासच्या सर्व नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत.
व्हिडीओ : ऋषीकेश राऊत,इचलकरंजी बातमीदार
#Ichalkaranji #PanchgangaRiver #IchalkaranjiFlooded #IchalkaranjiWaterLevelIncreased

Videos similaires