Satara : तांबवेत पुरातील मदतीसाठी स्पीड बोट सज्ज
Tambave, Satara : महापुरामुळे संपर्कहीन होणाऱ्या Tambave गावात प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रबरी speed boat दाखल झाली आहे. त्याचबरोबर Koyna नदीवरील नवीन पुलावरुन काल पाणी वाहुन गाव काहीकाळ संपर्कहीन झाले होते. आज सकाळी पाणी कमी झाले असले तरी कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे आणखी पाणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाकडून देण्यात आलेली boat आज ग्रामपंचायतीच्यावतीने वापरण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्यासाठीचे पोहणाऱ्या युवकांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी टी.एल. चव्हाण, तलाठी एस. आर. ढवण यांनी ग्रामस्थांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Video : अनिल बाबर
#tambave #satara