सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान, रक्त हे कधीच कृत्रिमरित्या बनवता येत नाही त्यामुळे दान करण्यात आलेले रक्त हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी आपल्या चौसष्ठ वर्षांच्या आयुष्यात १३५ वेळा रक्तदान केले. यासोबतच त्यांनी २१ वेळा प्लेटलेट्स देखील दान केले आहेत. कोविड काळात, आपण आपल्या लोकांसाठी काय करू शकतो हे देखील त्यांनी दाखवून दिले. या काळात त्यांनी पंधरा वेळा प्लाझमा देखील डोनेट केलाय. त्यांच्या या कारकिर्दीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने दखल घेतली, आणि त्यांचं नाव या पुस्तकात कोरण्यात आले. चला तर आज भेटूयात राम बांगड यांना आणि त्यांच्या कामाविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊया.
#blooddonation #rambangad #pune #COVID19 #PLASMA