pegasus spyware : पत्रकार, विरोधी पक्ष नेत्यांवर केंद्र पाळत ठेवत असल्याचं उघड?| india |Sakal Media
तुमची गोपनीयता ही सरकारच्या हातात असून तुमच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. राजकीय नेते, विरोधक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपत्री अशा सर्वांवर पाळत ठेवली जातेय. त्यामुळे गोपनीयता ही केवळ बोलण्याची गोष्ट आहे, ही धक्कादायक बाब जगभरातील 16 माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारिता प्रकल्पातून समोर आलीये. मोबाईल क्रमांकाचा वापर करुन लोकांवर पाळत ठेवली जातीये आणि यासाठी इस्त्रायलच्या पिगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येतीये. विशेष म्हणजे याच माध्यमातून भारतातील पत्रकार, मंत्री आणि विरोक्षी पक्ष नेत्यांवर पाळत ठेवण्यात आल्याचं उघड झालंय. यावरुन हा मुद्दा किती गंभीर आहे हे लक्ष्यात येईल. तर नेमकं हे प्रकरण काय आहे आणि पिगॅसस स्पायवेअर नेमकं काय आहे याची माहिती आपण घेऊया...
#pegasusspyware #journalist #LeaderoftheOpposition #Israel