Dehu : तुकोबांच्या अंगणी गेले रिंगण रंगूनी!
Dehu : आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात रविवारी (ता. ११) झाले. पायी वारीत तिथीनुसार हे गोल रिंगण बेलवंडी येथे दरवर्षी होत असते.
कोरोनामुळे यंदा पायी वारी रद्द केली आहे. मात्र, संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे पायी वारी नित्यातील कार्यक्रम, पूजा, कीर्तन दररोज देहूतील देऊळवाड्यात साजरे केले जात आहे. सरकारने दिलेल्या मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम परंपरेनुसार संस्थान करीत आहे.
#Ashadhi #Waari #SantTukaramMaharaj #palkhi #dehu