युरो कप आणि कोपा अमेरिकन चषकामुळे जगभरात फुटबॉल प्रेमाला भरते आले आहे. कोल्हापूरातही कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेनिमित्त काहीसा असाच उत्साह दिसून आला. रविवारी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. यानंतर कोल्हापूरमध्ये अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष करण्यात आल्याचे दिसून आले.
#EuroCup2021 #CopaAmerica #Sports