तब्बल सात वर्ष सत्तापदापासून वंचित राहिलेल्या नारायण राणेंना मंत्रिपद देण्यामागे भाजपाचा वेगळा हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुंबई-कोकणात सेनेशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपदाचा मोबदला देऊन भाजपाने राणेंची मदत घेतली आहे. या देवाण-घेवाणीचा खरंच किती लाभ होतो, हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येईल.
#NarayanRane #BJP #MantriMandal