पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुका आणि करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे खराब झालेली प्रतिमा पुन्हा नीट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मोठे फेरबदल करण्यात आले. यात उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७, तर महाराष्ट्राला ४ मंत्रिपदं नव्याने देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. मात्र असं असतानाच नव्याने संधी देण्यात आलेल्या खासदारांमध्ये दुसऱ्या पक्षांतून आलेल्या आयारामांचा भरणाच अधिक असल्याचं दिसत आहे.