Pune : सासवडला संत सोपानदेवांचा प्रस्थान सोहळा रंगला
- यंदाही वारीला मुरड घालून कोरोना नियम पाळून एसटीनेच -
Pune (सासवड, ता. 6) : टाळ - मृदंगाचा निनाद आणि निवडक दिंड्या - वारकरी यांची उत्साही उपस्थिती.. ढगाळ वातावरण व मंद वाऱयाच्या झुळका अंगावर झेलत... लोकरंग व भक्तीरंगात., श्री.संत सोपानदेवांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीच्या आषाढवारीचा प्रस्थान सोहळा आज भक्तीमय झाला. खरे तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीतील लाखभर वारकरी सोपानदेवांना पंढरीकडे निरोप देण्यासाठी असतात, मात्र यंदा दुसरे वर्ष असे की.. कोरोना नियम पाळून वारीला मुरड घालावी लागली आहे.
#santsopandev #palkhi #saswad #pune