Satara : भाजपचे 12 आमदार निलंबित; साताऱ्यात पडसाद, ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Satara : भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज साताऱ्यात भाजपने आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेते, मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे सरकारचा जाहीर निषेध नोंदवला. साताऱ्यातील पोवई नाका येथे हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने विधानमंडळाचा वापर करुन जुलूमशाही केली, हुकूमशाही केली आणि 12 आमदारांना निलंबित केलं. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र रोष आहे.
व्हिडिओ : प्रमोद इंगळे
#BJP #protest #satara