MPSC परीक्षार्थींचं गोपीचंद पडळकरांना आवाहन!

2021-07-04 5,596

पुण्याच्या फुरसुंगी परिसरामध्ये स्वप्नील लोणकर नावाच्या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील मुलाखतच न झाल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. मात्र, यावरून आता इतर परीक्षार्थींमध्ये सरकारविषयी आणि नेतेमंडळींविषयी संतापाची भावना आहे. शिवाय, MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील या परीक्षार्थींनी आवाहन केलं आहे.

#mpsc #students #GopichandPadalkar #pune