शिवकालीन कुंभारवाड्यातून विक्री सुरू झाली डिजिटलवर !

2021-07-03 1,106

इंस्टाग्राम, फेसबुक अशा समाज माध्यमातून पोचत आहेत ग्राहकांपर्यंत

राजेंद्र लष्करे

पुणे, ता. ३ ः लॉकडॉऊन... विविध प्रकारचे निर्बंध असले म्हणून काय झालं, पुण्यातील शिवकालीन कुंभारवाड्याने आता डिजीटल मार्केटिंग सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांची उत्पादने अगदी सातासमुद्रापारही जाऊ लागली आहेत. चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे कुंभारवाड्याला उभारी आली असून त्यांना आत्मविश्वासाची नवी झळालीही आली आहे.

शहरातील कसबा पेठेत अगदी शिवकाळापासून असलेल्या कुंभारवाड्याचा हंगाम मार्च महिन्यात सुरू होता. मात्र, त्याच काळात लॉकडाउन सुरू झाला. त्याचा परिणाम विक्रीवर झाला. या परिस्थितीला हार न जाता आपल्याची उत्पादनांची विक्री करण्याचे दूसरे पर्याय या व्यावसायिकांनी शोधले. लॉकडाउनचे निर्बंध वाढतच राहिले. मात्र फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअप ग्रूप आदींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केल्याने या लॉकडाउनच्या काळातही त्यांच्या उत्पादनांचा चांगला खप झाला. त्यामधे विविध प्रकारची चित्र, कलाकुसर केलेले मडकी, दिवे, पणत्या, वारकरी, वारली पेंटिंगची चित्रं, स्वयंपाकाची भांडी, कुंड्या आदी उत्पादनांचा समावेश आहे, असे विक्रेते अब्बास गलवानी यांनी सांगितले. ऑनलाईनद्वारे वस्तू पाठविताना त्यांचे पॅकिंगही चांगल्या पद्धतीचे असावे, यावर आम्ही आता लक्ष देत आहोत, असे युसूफ कुंभार यांनी नमूद केले.
#Pottery #Shivkalinkumbharwada #potterybuisness
#Potterybuisnessonline