कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गालगत असणारे निसर्गरम्य वर्षा पर्यटनस्थळ म्हणजे सावडाव धबधबा. गेली काही दिवस मॉन्सूनने दमदार हजेरी लावल्याने सावडाव धबधबा प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी तो आकर्षित करत आहे; मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदाही वर्षा पर्यटनाला हौशी पर्यटक मुकले आहेत. व्यवसायच ठप्प असल्याने सध्या धबधबा परिसरात धबधब्याच्या पाण्याचा अन् पक्षांचा किलबिलाटच ऐकू येतो.
#Savdav #waterfall #Savdavwaterfall #kankavli #Touristspot #Tourism